गुढीपाडवा या सणाचा इतिहास काय आहे?
आमच्या महाराष्ट्रात प्राचीन काळापासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जात आहे.
काठीवर जो कलश उपडा ठेवतात त्याला गुढी असं म्हणतात. पाडवा हा मराठी शब्द संस्कृत प्रातिपद या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ "नवीन सुरुवात" असा होतो.
गुढीवर सूर्यकिरणे प्रतिबिंबित होऊन घरात सकारात्मक ऊर्जा आणतात.
त्यावर रेशमाचा कपडा बांधला जातो जो इतर ऊर्जा शोषून घेतो.
कडुलिंब रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं, बरं करणारं आणि औषधी गुणधर्म असणारं झाड आहे. म्हणून त्याचीही पानं जोडतात.
गुढीच्या पाडव्याचे ऐतिहासिक संदर्भ लीळाचरित्रात सापडतात. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील आद्यग्रंथ (पहिला ग्रंथ) आहे. 13व्या शतकापर्यंत तरी मागे जातोच.
हरिजन संत चोखामेळा सुद्धा "टाळी वाजवावी, गुढी उभारावी" असं म्हणतात.
त्याशिवाय, संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराज सुद्धा गुढीचा उल्लेख अनेक वेळा करतात.
गुढीचा संदर्भ ब्रह्मा पुराणात आहे.
महाभारतात काही ठिकाणी गुढीला इंद्राच्या ध्वजाचा प्रतीक म्हटलं आहे.
1649 मध्ये गुढी उभारत होते यासाठी "गुढियाचा पाडवा" असा उल्लेख शिवचरित्रात आहे.
राजवाड्यांच्या मराठ्यांच्या इतिहासाची साधने यात ही गुढीयाच्या पाडव्याचा उल्लेख सापडतो (सन 1631/32).
टिप्पण्या