पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

गुढीपाडवा या सणाचा इतिहास काय आहे?

इमेज
आमच्या महाराष्ट्रात प्राचीन काळापासून गुढीपाडवा हा सण साजरा केला जात आहे. काठीवर जो कलश उपडा ठेवतात त्याला गुढी असं म्हणतात. पाडवा हा मराठी शब्द संस्कृत प्रातिपद या शब्दावरून आला आहे, ज्याचा अर्थ "नवीन सुरुवात" असा होतो. गुढीवर सूर्यकिरणे प्रतिबिंबित होऊन घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. त्यावर रेशमाचा कपडा बांधला जातो जो इतर ऊर्जा शोषून घेतो. कडुलिंब रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारं, बरं करणारं आणि औषधी गुणधर्म असणारं झाड आहे. म्हणून त्याचीही पानं जोडतात. गुढीच्या पाडव्याचे ऐतिहासिक संदर्भ लीळाचरित्रात सापडतात. लीळाचरित्र हा मराठी भाषेतील आद्यग्रंथ (पहिला ग्रंथ) आहे. 13व्या शतकापर्यंत तरी मागे जातोच. हरिजन संत चोखामेळा सुद्धा "टाळी वाजवावी, गुढी उभारावी" असं म्हणतात. त्याशिवाय, संत ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज आणि एकनाथ महाराज सुद्धा गुढीचा उल्लेख अनेक वेळा करतात. गुढीचा संदर्भ ब्रह्मा पुराणात आहे. महाभारतात काही ठिकाणी गुढीला इंद्राच्या ध्वजाचा प्रतीक म्हटलं आहे. 1649 मध्ये गुढी उभारत होते यासाठी "गुढियाचा पाडवा" असा उल्लेख शिवचरित्रात आहे. राजवाड्यांच्या मराठ...

गुळाचा चहा कशामुळे फुटतो, गुळाचा चहा फुटू नये यासाठी काय उपाय करायला हवा?

खरंतर साखरेच्या चहा पेक्षा गुळाचा चहा उपयुक्त आहे!! पण ते बनवण्याची योग्य पद्धत आहे. साखरेच्या चहात दूध मिसळले व ते उकळले असता; ते त्यात सहज विरघळून जाते.. पण गुळाच्या चहात दूध मिसळले व ते उकळले असता; गुळ आणि दुधाच्या संयोगाने; दूध फुटते! व चहा पिण्यायोग्य राहत नाही. पण थंड, कोमट दुधात गुळ विरघळला असता दूध फुटत नाही! ते आपण पिऊ शकतो!! त्यामुळे गुळाचा चहा असा बनवा-- प्रथम भांड्यात पाणी, गुळ, चहापूड एकत्र उकळवावे. गुळ, चहापूड त्यात विरघळली असता; ते भांडे खाली उतरवावे व त्यात सामान्य तापमानाचे दूध ओतावे. व तो चहा प्यावा! टीप- गुळाच्या चहात दूध ओतल्यावर पुन्हा ते भांडे गॅसवर उकळू नये नाहीतर चहा पुन्हा फुटण्याचा संभव आहे!! हा पण ज्यांना साखरेचा फडफडता, उकळता चहाचा प्यायची सवय आहे; त्यांना गुळाचा चहा मात्र कमी तापमानाचा प्यावा लागेल!!..

महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?

इमेज
महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा सध्या अहमदनगर जिल्हा असून त्याचे क्षेत्रफळ १७४१३ चौ.किमी. एवढे आहे. त्यानंतर पुणे (१५६४२ चौ.किमी.) व नाशिक (१५५३० चौ.किमी.) या जिल्ह्यांचा क्रमांक येतो.

ब्रम्हदेशाचा थिबा राज्याचा राजवाडा महाराष्ट्रात कुठे आहे?

इमेज
ब्रिटिशांनी जगभर आपले पाय पसरवताना साम, दाम, दंड, भेद या सर्वांचा अवलंब केला आणि तो करत असतानाच मानवताही वेशीला टांगली. भारतातील एकामागोमाग सर्व संस्थाने खालसा करताना त्यांनी याच नीतीचा अवलंब केला. ब्रिटीशांच्या क्रुरपणाचा आणखी एक पुरावा म्हणजे रत्नागिरीचा थिबा पॅलेस