गुळाचा चहा कशामुळे फुटतो, गुळाचा चहा फुटू नये यासाठी काय उपाय करायला हवा?
खरंतर साखरेच्या चहा पेक्षा गुळाचा चहा उपयुक्त आहे!! पण ते बनवण्याची योग्य पद्धत आहे.
साखरेच्या चहात दूध मिसळले व ते उकळले असता; ते त्यात सहज विरघळून जाते..
पण गुळाच्या चहात दूध मिसळले व ते उकळले असता; गुळ आणि दुधाच्या संयोगाने; दूध फुटते!
व चहा पिण्यायोग्य राहत नाही.
पण थंड, कोमट दुधात गुळ विरघळला असता दूध फुटत नाही! ते आपण पिऊ शकतो!!
त्यामुळे गुळाचा चहा असा बनवा--
प्रथम भांड्यात पाणी, गुळ, चहापूड एकत्र उकळवावे. गुळ, चहापूड त्यात विरघळली असता;
ते भांडे खाली उतरवावे व त्यात सामान्य तापमानाचे दूध ओतावे. व तो चहा प्यावा!
टीप- गुळाच्या चहात दूध ओतल्यावर पुन्हा ते भांडे गॅसवर उकळू नये नाहीतर चहा पुन्हा फुटण्याचा संभव आहे!!
हा पण ज्यांना साखरेचा फडफडता, उकळता चहाचा प्यायची सवय आहे; त्यांना गुळाचा चहा मात्र कमी तापमानाचा प्यावा लागेल!!..
टिप्पण्या