मोहनगड

गडावर जायची वाट म्हणजेसह्याद्रीची सफरच आहे. तोरणा,राजगड, चंद्र, मंगळ , रायगड , कावळ्या असे अजून भरपूर किल्ले दिसतात गड सर करताना. गडावर "जननीआई" चे मंदिर आहे म्हणून याला "जननीदुर्ग" असेही संबोधिले जाते. गडावर आम्हाला दोन पाण्याच्या टाक्या दिसल्या , त्यातील एक कोरडे होते आणि दुसर्या मध्ये पाणी होते, शेजारीच मधमाश्याचे पोळे आहे म्हणून टांक मधून पाणी घेताना सावधगिरी बाळगावी. गडावर तटबंदी, वाडा असे काहीच अवशेष नाहीत परंतु वर जाणार्या पायर्या कोरलेल्या दिसतात काही ठिकाणी. गड फिरायला २० ते ३० मिनिट खूप झाले, हो पण वरून चोहोबाजूने दिसणारा सह्याद्री निहाळायला दिवस कमीच

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

सुखी जीवनासाठी काय करावे?

पुढील दशकात artificial intelligence औषधाच्या क्षेत्रात कशी क्रांती घडवू शकते?

जुन्या नाण्यांच्या खऱ्या किंमती कुठे पाहायला मिळतील?