वाय फाय राऊडर
मोबाइलला वाय-फाय सुविधा आहे, परंतु महागड्या दरांमुळे तुम्ही 4जी किंवा 3जी वापरत नाही? तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. अनेक भारतीय 4जी सेवा पुरवठादारलवकरच खिशात बसतील असे वाय-फाय राउटर्स बाजारात उपलब्ध करणार आहेत. येऊ घातलेल्या या राउटरमुळे एज (EDGE) आणि 3जी सुविधा असणाऱ्या स्मार्टफोन्सना वेगवान इंटरनेटउपलब्ध करता येणार आहे. भारतात 3जी सुविधा उपलब्ध आहे, मात्र 3जी सेवा असलेली सर्व असणारी सर्व उपकरणे महाग असल्याने अनेकग्राहक 2जी सेवेचा अधिक वापर करतात. तसेच, स्वस्त सेवेसाठी तेवेगळे डेटा प्लॅनही घेतात.मिनी वायरलेस राउटरमुळे एकच डेटा प्लॅन घेऊन 4जी नेटवर्कच्या साहाय्याने आपण आय-पॅड, टॅब्लेट, नोटबूक, फोन आणिलॅपटॉप अशा विविध उपकरणांवर इंटरनेट जोडणी करू शकता. त्यामुळे इंटरनेट स्वस्तात उपलब्ध होईल. या नव्या वाय-फाय राउटरची किंमत अडीच हजारांच्या आसपास असेल.भारतात बी.एस.एन.एल., टाटा टेलेल, मायक्रोमॅक्स आणि टाटा डोकोमो यांनी एव्हाना असे पॉकेट वाय-फाय राउटर्स बाजारात आणले आहेत.
टिप्पण्या