फेसबुक वर वापरा हॉश(#)टॉग
माक्रोब्लॉगीगमधील आघाडीच्या ट्टिवटरप्रमाणे आता फेसबुकने देखील हॅश(#)टॅगचा समावेश केला आहे. हॅशटॅगमुळे युझर्सना आपल्या सर्चशी संबंधीत विषय शोधणे अधिक सोपे जाते.फेसबुकने बुधवारी आपल्या सर्चमध्ये हॅशटॅगचा समावेश करत असल्याचे जाहीर केले. यामुळे फेसबुक युझर्सना त्यांना हव्या त्या विषयासंदर्भातील सर्च माहिती अधिक सहजपणे मिळवता येणार आहे.युझर्सना एखादा विषय किंवा एखादी व्यक्ती काय चर्चा करत आहे याची माहिती मिळवण्याच्या दृष्टीचे हे पहिले पाऊल असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. या फिचरमुळे फेसबुक युझर्सना जगभरातील युझर्स कोणत्या विषयावर चर्चा करत आहे याचे अपडेट सहजपणे मिळू शकतील. हॅशटॅग हा प्रकार याआधीच ट्टिवटरवर प्रसिद्ध आहे.
टिप्पण्या